नगर - मुकुंद नगर येथे विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांवर झाडांच्या मोठ्या फांद्या
अहिल्यानगर दि. 3 जुलै (हिं.स.) :- मुकुंद नगर येथे विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांवर झाडांच्या मोठ्या फांद्या काढायच्या मागणीला यश आले असून महावितरण व महानगरपालिका यांच्या कर्मचाऱ्यांनी फांद्या कापून विद्युत पुरवठा करणारी तार मोकळी केलेली आहे.परिसरातील
मुकुंद नगर येथे विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांवर झाडांच्या मोठ्या फांद्या


अहिल्यानगर दि. 3 जुलै (हिं.स.) :- मुकुंद नगर येथे विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांवर झाडांच्या मोठ्या फांद्या काढायच्या मागणीला यश आले असून महावितरण व महानगरपालिका यांच्या कर्मचाऱ्यांनी फांद्या कापून विद्युत पुरवठा करणारी तार मोकळी केलेली आहे.परिसरातील नागरिकांच्या वतीने माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक यांचा सत्कार करण्यात आला.

मुकुंदनगर फकीरवाडा परिसरात तमीमदारी मशीद शेजारील असलेल्या जुन्या झाडांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले होते सदर झाडाच्या मोठ्या फांद्या विद्युत महावितरणाच्या मुख्य तारांवर गेलेल्या आहे व पावसाळ्या त वारा चालू झाला की तारा एकमेकांना चिकटतात व विद्युत पुरवठा बंद होते व चालू झाल्यानंतर ओल्या झाडां मध्ये करंट उतरतो.या झाडातून घरांच्या कंपाउंड मध्ये करंट उतरण्याची शक्यता होती.तसेच या झाडांच्या फांद्यांमुळे तारा तुटून घरावर किंवा रस्त्यावर पडू शकतात.हा रस्ता वरदळीचा असून बहुतेक शाळकरीमुळे याच रस्त्यावरून येजा करतात व बरेच लोकं धार्मिक स्थळातून याच रस्त्या वरून जा ये करतात.त्यामुळे सदर परिसरामध्ये मुख्य विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांवर असणाऱ्या झाडाच्या फांद्या कापण्याची मागणी करण्यात आली होती.या मागणीची दखल घेत विद्युत महावितरण व महानगर पालिका यांच्या कर्मचाऱ्यांनी फांद्या कापून विद्युत पुरवठा करणारी तार मोकळी केलेली आहे.त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या वतीने माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक यांचा नागरिक सत्कार करून आभार मानण्यात आले.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande