पुणे, 3 जुलै (हिं.स.)।
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील सर्व धोकादायक ठिकाणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येत आहे. स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालासाठी दहा दिवसांची मुदत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. सात विभागांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल दिले आहेत, इतर विभागांना दहा दिवसांत अहवाल द्यावा लागणार आहे.
जिल्ह्यातील जुने पूल, साकव, इमारती, रस्ते, जाहिरात फलक, रेल्वे पूल यासारख्या सार्वजनिक ठिकाणांची स्थिती पाहता स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. ही तपासणी केवळ तज्ज्ञ संस्था किंवा व्यक्तीकडूनच करण्यात यावी, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली असून, त्यामुळे अनेक यंत्रणांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील अभियंत्यांची मदत घेतली आहे.
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु