जालना, 30 जुलै (हिं.स.)। जालना जिल्हयात पोस्टे घनसावंगी हद्दीतील कुंभारपिंपळगाव येथील ज्ञानेश्वर मधुकर दहीवाळ यांचे ज्ञानेश्वरी ज्वेलर्स येथे दिनांक 23/07/2025 रोजी फिर्यादीचे दुकानाच्या चॅनेल गेटचे व शटरचे कुलूप तोडुन दुकानात प्रवेश करुन चार अज्ञान इसमांनी त्यांच्या दुनाकातून 19,76,500 रुपयाचे सोने चांदीचे दागिने चोरुन नेले. चार अज्ञात ईसमां विरुद्ध पोलीस ठाणे घनसावंगी गुरनं. 392/2025 कलम 331(4), 305 (अ) भान्यासं प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता.
सदर गुन्हयाचा तपास चालु असतांना दिनांक 29/07/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा शक्तीसिंग उर्फ शक्तीमान प्रल्हादसिंग टाक वय 22 वर्ष रा. गुरुगोविंदसिंग नगर जालना याने त्याचे तीन साथीदारासह केला असल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन गुन्हयाच्या संबंधाने विचारपुस केली . त्याने गुन्हा केल्याची कबुली देऊन त्याचे कडुन गुन्हयातील 5,67,820 रु किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे. तसेच फिर्यादी नामे रविंद्र बापुराव कारके रा. पाचोड रोड अंबड यांनी पोलीस ठाणे अंबड येथे फिर्याद दिली होती की, त्यांची 1,50,000/- रु किंमतीची मारुती सुझुकी कंपनीची अल्टो LXI सिल्वर रंगाची कार जिचा पासिंग क्र. MH 12 BM 8706 ही त्यांचे राहते घरासमोरुन कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेले म्हणुन पोलीस ठाणे अंबड येथे गुरनं. 381/2025 कलम 303(2) भान्यासं प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर 1,50,000 रु किंमतीची मारुती सुझुकी कंपनीची अल्टो LXI सिल्वर रंगाची कार जिचा पासिंग क्र. MH 12 BM 8706 ही जप्त करण्यात आली आहे. तसेच सदर आरोपीतांनी पोलीस ठाणे फत्तेपुर जि. जळगाव येथील चोपडे नगर व पोलीस ठाणे वडोद बाजार जि. छत्रपती संभाजी नगर येथील आळंद येथील मेडीकल फोडले बाबत कबुली दिली असुन आरोपीतां कडुन एकूण 7,19,820 रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
वरील प्रमाणे एकुण 04 घरफोडीचे व कार चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहे. नमुद आरोपीस पुढील तपासकामी पोलीस ठाणे घनसावंगी जालना यांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल व मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, सोबत स्थागुशाचे अमंलदार सॅम्युअल कांबळे, भाऊराव गायके, प्रभाकर वाघ, रमेश राठोड, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, इरशाद पटेल, संदीप चिंचोले, सतिष श्रीवास, आक्रुर धांडगे, रमेश काळे, धीरज भोसले, कैलास चेके, सौरभ मुळे अशोक जाधवर यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / KULKARNI AMIT ANIL