भरत अरुण लखनऊ सुपर जायंट्सचे नवे गोलंदाजी प्रशिक्षक
लखनऊ, 30 जुलै (हिं.स.) : आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्स संघाने भरत अरुण यांना त्यांचे नवीन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. ते २०२२ ते २०२५ पर्यंत चार वर्षे कोलकाता नाईट रायडर्सशी संबंधित होते आणि २०२४ मध्ये संघा
भरत अरुण


लखनऊ, 30 जुलै (हिं.स.) :

आयपीएलमधील

लखनऊ सुपर जायंट्स संघाने भरत अरुण यांना त्यांचे नवीन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून

नियुक्त केले आहे. ते २०२२ ते २०२५ पर्यंत चार वर्षे कोलकाता नाईट रायडर्सशी

संबंधित होते आणि २०२४ मध्ये संघाला चॅम्पियन बनवण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला

होता. भरत अरुण यापूर्वी टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते आणि त्यांच्या

प्रशिक्षणाखाली भारताच्या गोलंदाजींनी चांगली कामगिरी केली होती. आता त्यांनी

एलएसजीशी दोन वर्षांचा करार केला आहे.

केकेआर

आणि भरत अरुण परस्पर संमतीने वेगळे झाले आहेत. केकेआरचा असा विश्वास आहे की, जास्त

प्रशिक्षण इनपुट असल्याने संघात गोंधळ निर्माण होऊ शकतो. संघाचे मार्गदर्शक ड्वेन

ब्राव्हो देखील गोलंदाजी रणनीतीमध्ये सक्रिय भूमिका बजावतात. म्हणूनच भरत अरुण

यांना नवीन संघात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.केकेआरचे धोरण असे आहे की, जर एखाद्या

स्टाफ सदस्याला त्याची व्यावसायिक कारकीर्द पुढे नेण्याची इच्छा असेल तर फ्रँचायझी

त्याच्या मार्गात येत नाही. अरुण यांनाही हेच सांगण्यात आले.

भरत

अरुणच्या यांच्या आगमनानंतरगेल्या

हंगामात एलएसजीचे मार्गदर्शक असलेले झहीर खान यांचा कार्यकाळ वाढवला जाणार नाही हे

स्पष्ट झाले आहे. त्यांचा करार एक वर्षासाठी होता आणि आता तो नूतनीकरण केला जात

नाही. याशिवायमुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांचे पुनरागमन देखील कठीण मानले जात

आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande