प्रो कबड्डी लीगचा १२ वा हंगाम २९ ऑगस्टपासून सुरु होणार
मुंबई, 31 जुलै, (हिं.स.) प्रो कबड्डी लीगचा १२ वा हंगाम यावेळी २९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. विशाखापट्टणम, जयपूर, चेन्नई आणि दिल्ली या चार शहरांमध्ये पीकेएलच्या सामन्यांचा थरार रंगणार आहे. पहिला सामना तेलुगू टायटन्स आणि तमिळ
प्रो कबड्डी लीग ट्रॉफी


मुंबई, 31 जुलै, (हिं.स.) प्रो

कबड्डी लीगचा १२ वा हंगाम यावेळी २९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. विशाखापट्टणम, जयपूर, चेन्नई

आणि दिल्ली या चार शहरांमध्ये पीकेएलच्या सामन्यांचा थरार रंगणार आहे. पहिला सामना

तेलुगू टायटन्स आणि तमिळ थलैवाज यांच्यात २९ ऑगस्ट रोजी विशाखापट्टणमच्या राजीव

गांधी इनडोअर स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दुसऱ्या सामन्यात बंगळुरू बुल्सचा सामना पुणेरी पलटनशी होईल.३० ऑगस्ट रोजी तेलुगू टायटन्स पुन्हा एकदा मैदानात

उतरेल आणि यावेळी त्यांचा सामना यूपी योद्धाशी होईल. तर दुसऱ्या सामन्यात यू मुंबा

आणि गुजरात जायंट्स एकमेकांसमोर येतील.

१२

सप्टेंबरपासून जयपूरमधील एसएमएस स्टेडियमच्या इनडोअर हॉलमध्ये सामने सुरू होतील. जयपूर पिंक पँथर्स बंगळुरू बुल्सशी

लढतील. त्यानंतर तमिळ थलाईवाज आणि बंगाल वॉरियर्स यांच्यात लढत होईल. २९

सप्टेंबरपासून चेन्नईतील एसडीएटी मल्टीपर्पज इनडोअर स्टेडियममध्ये सामने खेळले

जातील. या टप्प्यातयूपी योद्धाज गुजरात जायंट्सशी लढतील आणि दबंग दिल्ली केसी हरियाणा

स्टीलर्सशी लढतणार आहेत.

साखळी सामन्यातील शेवटचा टप्पा १३ ऑक्टोबरपासून दिल्लीतील

त्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू होईल. या टप्प्यातील मुख्य सामने पटना

पायरेट्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स आणि यू मुंबा विरुद्ध यूपी योद्धा हे असतील.

प्लेऑफचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

आयोजकांनी एका निवेदनात म्हटले

आहे की, पीकेएलचा १२ वा हंगाम प्रो कबड्डी

लीगच्या विकासातील एक नवीन अध्याय आहे. यावेळी मल्टी-सिटी फॉरमॅटसहआम्ही देशभरातील कबड्डी चाहत्यांपर्यंत

पोहोचत आहोत. आणि विशाखापट्टणमला कबड्डीचे सामने परतणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट

आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande