लंडन, 31 जुलै (हिं.स.)
भारतीय
क्रिकेट संघात पुनरागमनाची वाट पाहत असलेला फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने काउंटी
चॅम्पियनशिपमध्ये शानदार गोलंदाजी केली. नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना त्याने
डर्बीशायर विरुद्ध ५ बळी घेतले. ब्लेअर टिकनरची विकेट घेत त्याने डावातील आपला
सहावा बळी घेतला. या डावात त्याने सर्वाधिक ३३.२ षटके टाकली.
नॉर्थम्प्टनमध्ये
खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात डर्बीशायर काउंटी क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकून
प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. युजवेंद्र चहलने हॅरी कॅमच्या रूपात आपला
पहिला बळी घेतला.त्याने कॅमला एलबीडब्ल्यू बाद केले. त्यानंतर त्याने सलामीवीर लुईस रीसच्या रूपात
मोठी विकेट घेतली. चहलने बेन एचिसनला बाद करून डावात ५ विकेट घेतल्या. भारतीय
फिरकी गोलंदाजाने त्याला बाद केले तेव्हा एचिसन ४५ धावांवर खेळत होता आणि तो
चांगली फलंदाजी करत होता. चहलने डावातील शेवटची आणि त्याची सहावी विकेट ब्लेअर
टिकनरची घेतली. चहलने ३३.२ षटकांमध्ये ३.५४ च्या इकॉनॉमीने ११८ धावा दिल्या.
युजवेंद्र
चहलच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर नॉर्थम्प्टनशायरने पहिल्या डावात डर्बीशायरला
३७७ धावांवर गुंडाळले. दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेरीस नॉर्थम्प्टनशायरने ५ विकेट
गमावल्यानंतर २६५ धावा केल्या आहेत.नॉर्थम्प्टनशायर अजूनही ११२ धावांनी मागे आहे.
नॉर्थम्प्टनशायर संघासाठी ल्यूक प्रॉक्टरने सर्वाधिक ७१ धावा केल्या. जॉर्ज
बार्टलेट ६० धावा करून नाबाद आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra