नाशिक - जि.प चे सेस नियोजन रद्द
नाशिक, 30 जुलै, (हिं.स.)। जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांनी एका दलालाला हाताशी धरून सेस फंडातून बांधकामच्या तिन्ही विभागांचे केलेले नियोजन रद्द करण्यात आले आहे. झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आल्याने परस
जि.प चे सेस नियोजन रद्द सर्वसाधारण सभेत सीईओचे अधिकाऱ्यांनी दिले आदेश


नाशिक, 30 जुलै, (हिं.स.)। जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांनी एका दलालाला हाताशी धरून सेस फंडातून बांधकामच्या तिन्ही विभागांचे केलेले नियोजन रद्द करण्यात आले आहे. झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आल्याने परस्पर हात मारू पाहणाऱ्यांना दणकाच बसला आहे.

जिल्हा परिषदेचा यावर्षीचा सेस फंड ६१ कोटी रूपयांच्या घरात आहे. त्यापैकी बराचसा निधी रस्ते, मोऱ्या बांधकाम तसेच दुरूस्तीसाठी ठेवण्यात आला आहे. या निधीवर साऱ्यांचाच डोळा आहे. आमदार निधी मिळत असतानाही आमदारांनी सेस फंड मिळावा म्हणून लेखी पत्र दिले आहे. पत्रांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. दुसरीकडे अधिकारी आणि काही दलालांच्याही तोंडाला पाणी सुटले आहे.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी परस्पर नियोजन केले होते. त्यात एका दलालाने लाखमोलाची भुमिका बजावली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर एका आमदाराने प्रशासनाला खडेबोल सुनावले आणि परस्पर केलेल्या नियोजनाचा भांडाफोड झाला. सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना तसेच मजूर संघानेही नियोजनास आक्षेप नोंदविला होता. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या नियोजनाला स्थगिती दिली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande