कोल्हापूरच्या राहुल पाटील, राजेश पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित; अजित पवारांची घेतली भेट
कोल्हापूर, 31 जुलै (हिं.स.) : काँग्रेसचे दिवंगत आ. पी. एन. पाटील यांचे दोन्ही सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्यासह कै. पी. एन. पाटील गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे.
राहुल पाटील राजेश पाटील अजित पवार भेट


कोल्हापूर, 31 जुलै (हिं.स.) : काँग्रेसचे दिवंगत आ. पी. एन. पाटील यांचे दोन्ही सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्यासह कै. पी. एन. पाटील गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. मुंबईमध्ये या सर्वांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हेही उपस्थित होते. कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत १९ किंवा २५ तारखेला समारंभपूर्वक हा पक्षप्रवेश होणार आहे.

काँग्रेस पक्षाशी निष्ठा ठेवून आयुष्यभर राजकारण करताना दिवंगत आ. पी एन पाटील यानी अनेक जय-पराजयाचे धक्के खाले. काँग्रेस पक्षाबरोबरच गांधी घराण्यावर अढळ निष्ठा. माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यानी काम केले. करवीरचे आमदार, वीज मंडळाचे शासन नियुक्त सदस्य, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, चेअरमन, राजीव गांधी सह. सुतगिरणीचे संस्थापक, चेअरमन, भोगावती साखर कारखन्याचे चेअरमन, ही पदे त्यानी भुषवली. स्व. राजीव गांधींच्या पुतळ्याची उभारणी आणि त्याचे श्रीमती सोनिया गांधी यांच्या हस्ते अनावरण आणि राजीव गांधी जयंती दिनी काढण्यात येणारी सद्भावना दौड हा त्यांच्या काँग्रेस आणि गांधी घराण्यावरील निष्ठेचा कळस मानला जात होता. याच माध्यमातून त्यांचे पुत्र राहुल पाटील यानां कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले. दुसरे पुत्र राजेश पाटील यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालकपद मिळाले. पण आ. पी. एन पाटील यांच्या निधनानंतर राहुल पाटील यांनी काँग्रेसकडून करवीरमध्ये विधानसभा लढवली पण त्यांचा निसटता पराभव झाला. त्यामुळेच आगामी राजकिय भवितव्याचा विचार करून राहुल पाटील, राजेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शिष्टाईतून ना. अजित पवार यांची मुंबईत भेट घेऊन त्यानी पक्ष प्रवेश निश्चित केला.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह, केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे, माजी संचालक पी. डी. धुंदरे, सत्यजित पाटील, करवीर पं. स. माजी सभापती बी. एच. पाटील, कोल्हापूर बाजार समितीचे माजी संचालक भारत पाटील- भुयेकर, करवीर काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, भोगावतीचे साखर कारखान्याचे संचालक ए. डी. चौगुले, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक सत्यजित पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य चेतन पाटील, हंबीरराव वळके, गणेश आडनाईक आदी प्रमुख उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande