डोंबिवली, 30 जुलै, (हिं.स.)। रेल्वे प्रशासनाच्या नियमानुसार अपंग, अंध, कर्णबधिर दिव्यांग प्रवाशांकरता रेल्वे गाडीत राखीव डबा असतो. या डब्यात सामान्य प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई असते. मात्र गर्दीचे कारण पुढे करत सामान्य प्रवासी दिव्यांग राखीव डब्यात प्रवास करतात. अशा प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने कारवाई केली जाते. जुलै महिन्यात डोंबिवली रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई करत 99 प्रवाशांना पकडले. हे प्रवाशी दिव्यांग डब्यात प्रवास करत होते. या प्रवाशांना रेल्वे न्यायालयात हजर केले जाते. दिव्यांग डब्यात प्रवासा करताना पोलिसांनी पकडल्यास अशा प्रवाशांना 200 रुपये दंङ आकराला जातो. हे प्रवाशी दिव्यांग डब्यात प्रवास करत होते. दिव्यांग प्रवाशांव्यतिरिक्त समान्य नागरिकांनी राखीव डब्यात प्रवास करू नये, कारण त्यामुळे दिव्यांग प्रवाशांना प्रवास करताना त्रास होत असतो असे आवाहन रेल्वे सुरक्षा बलाने केले आहे.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi