एक्सप्रेसच्या वेळेबाबत खा. स्मिताताई वाघ यांनी लोकसभेत उचलला आवाज
जळगाव , 30 जुलै (हिं.स.) देवळाली-भुसावळ आणि सुरत-भुसावळ एक्सप्रेसच्या वेळेबाबत जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी लोकसभेत आवाज उचलला आहे. त्यांनी या दोन्ही गाड्यांची पूर्ववत वेळापत्रक तातडीने पुन्हा लागू करण्याची मागणी संसदेतून केली. रेल्वे वेळापत
एक्सप्रेसच्या वेळेबाबत खा. स्मिताताई वाघ यांनी लोकसभेत उचलला आवाज


जळगाव , 30 जुलै (हिं.स.) देवळाली-भुसावळ आणि सुरत-भुसावळ एक्सप्रेसच्या वेळेबाबत जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी लोकसभेत आवाज उचलला आहे. त्यांनी या दोन्ही गाड्यांची पूर्ववत वेळापत्रक तातडीने पुन्हा लागू करण्याची मागणी संसदेतून केली.

रेल्वे वेळापत्रकातील बदलामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघातील सामान्य प्रवाशांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. ही बाब खा. स्मिता वाघ यांनी संसदेत मांडली. बदललेल्या वेळांमुळे प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना, नोकरदारांना, व्यापाऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना ताण, वेळेची अडचण आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. गाडी क्र. 19005 – सूरत-भुसावळ एक्सप्रेस पूर्वी उधना येथून रात्री 11:27 वाजता सुटणारी ही गाडी सकाळी 8:45 ला जळगाव स्थानकात पोहोचत होती. आता ती सकाळी 7:00 वाजता जळगावला पोहोचते, ज्यामुळे दोंडाईचा ते धरणगाव परिसरातील प्रवाशांना रात्री 3 वाजता उठून प्रवास करावा लागत आहे. यामुळे मानसिक व शारीरिक त्रास होत असून विद्यार्थ्यांचे व नोकरदारांचे हाल सुरू आहेत. गाडी क्र. 11113 – देवलाळी-भुसावळ एक्सप्रेस पूर्वी चाळीसगाव व पाचोरा स्थानकांवर अनुक्रमे 7:40 व 8:30 वाजता पोहोचणारी ही गाडी आता सुमारे 2 तास उशिराने पोहोचते. या बदलामुळे सुमारे 5,000 प्रवासी – विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी, रुग्ण व शेतकरी – त्रस्त झाले आहेत. अनेक प्रवासी आता खासगी वाहनांचा व असुरक्षित प्रवासाचा पर्याय स्वीकारत आहेत, ज्यामुळे आर्थिक व सामाजिक समस्यांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे या दोन्ही गाड्यांची पूर्ववत वेळापत्रक तातडीने पुन्हा लागू करण्यात यावी, अशी संसदेतून मागणी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande