पुणे : ‘पीएमपी’ बसेसच्या मार्गांत बदल
पुणे, 31 जुलै (हिं.स.)। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने सारसबाग चौकात अनुयायांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते, हे लक्षात घेऊन पीएमपी प्रशासनाने शुक्रवारी ५०हून अधिक बस मार्गांत बदल केला आहे. हा बदल तात्पुरता स्वरूपाचा असण
PMP Bus news for today news


पुणे, 31 जुलै (हिं.स.)।

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने सारसबाग चौकात अनुयायांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते, हे लक्षात घेऊन पीएमपी प्रशासनाने शुक्रवारी ५०हून अधिक बस मार्गांत बदल केला आहे. हा बदल तात्पुरता स्वरूपाचा असणार आहे. दुपारनंतर मार्गात बदल होईल, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले आहे.

शुक्रवारी दुपारच्या वेळेत जेधे चौक आणि सारसबाग येथील रस्ते बंद झाल्यास पुढील बस मार्ग बदलण्यात येतील

बदललेला मार्ग सारसबाग व जेधे चौक परिसरातील वाहतूक वळविण्यात येणार असून संबंधित बस मार्गांतील बस लक्ष्मी नारायण टॉकीजमार्गे मित्र मंडळ चौक, सारसबागमार्गे वळविण्यात येतील.

स्वारगेटमधील नटराज बसस्थानक बंद झाल्यास तेथून सुटणाऱ्या बस खंडोबा मंदिर, पर्वती पायथा येथून सुरू होतील. रस्ता पूर्ववत सुरू झाल्यानंतर पुन्हा नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू होईल. या बदलांची प्रवाशांनी नोंद घ्यावी व पीएमपी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले

----------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande