पुणे, 31 जुलै (हिं.स.)।
कोंढव्यातीलअनधिकृत बांधकामे शोधून ते पाडण्याचे काम सुरू आहे. कोंढव्यातील मलिकनगर परिसरातील सर्व्हे क्रमांक ४६ मधील एका चार मजली बांधकामावर, तर साईबाबा नगरमधील सर्व्हे क्रमांक ६२ मधील तीन मजली बांधकाम पाडण्यात आले. या कारवाईमध्ये सुमारे ३ हजार ८००चौरस फुटाचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु