गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाची भव्य तयारी : कोकणात १२५० जादा बसेस
छत्रपती संभाजीनगर, 30 जुलै (हिं.स.)। कोकणात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांचा मुंबई व कोकणाकडे ओघ वाढला असून, त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने भव्य वाहतूक व्यवस्था आखली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे – छत्रपती सं
गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाची भव्य तयारी : कोकणात १२५० जादा बसेस


छत्रपती संभाजीनगर, 30 जुलै (हिं.स.)। कोकणात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांचा मुंबई व कोकणाकडे ओघ वाढला असून, त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने भव्य वाहतूक व्यवस्था आखली आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे – छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशीव, परभणी आणि नांदेड येथून एकूण १ हजार २५० जादा बसेस मुंबईकडे सोडण्यात येणार आहेत. या बसेस २३ ऑगस्ट रोजी मुंबईकडे रवाना होतील आणि नंतर २७ ऑगस्ट रोजी मुंबईहून कोकणात पाठवण्यात येतील.

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणे नेहमीच एक मोठे आव्हान असते. रेल्वे आणि रस्त्यांवर मोठी गर्दी पाहायला मिळते. कोकण रेल्वेची तिकिटे काही मिनिटांत हाऊसफुल होतात, त्यामुळे एसटीची गरज अधिक भासते. यामुळे एसटी महामंडळ दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणातील चाकरमान्यांसाठी अतिरिक्त बसेसची सोय करणार आहे.

दरम्यान, प्रत्येक आगरातून निघणाऱ्या बसगाड्यांसाठी वाहकांची कमतरता भासू नये म्हणून दोन वाहकांना एकत्र नेमण्यात येणार असून, त्यांनी जुन्या पद्धतीच्या (रोलसह) इटीआय मशीनसह तिकीट व्यवस्था पाहावी लागेल. एसटी महामंडळाला यामुळे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

गौरी गणपतीनिमित्त देखील कोकणात जादा बसेस धावणार असून, यावर प्रादेशिक व्यवस्थापन नियंत्रण समिती क्रमांक १ नियंत्रण ठेवणार आहे. काही दिवसांपूर्वीच ही समिती स्थापन करण्यात आली असून गणेशोत्सव काळात तिचे सक्रिय संचालन राहणार आहे. राज्यभरातील भाविकांसाठी ही सुविधा अत्यंत दिलासादायक ठरणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande