नांदेड - मिशन निर्भया अंतर्गत सखोल जनजागृती
नांदेड, 30 जुलै (हिं.स.)। नांदेड पोलीस दलातर्फे शांकुतल स्कूल फॉर एक्सलन्स पासदगाव, नांदेड येथे विद्यार्थ्यांसाठी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शनाचे मुख्य विषय : सायबर सुरक्षितता व सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर,
नांदेड - मिशन निर्भया अंतर्गत सखोल जनजागृती


नांदेड, 30 जुलै (हिं.स.)।

नांदेड पोलीस दलातर्फे शांकुतल स्कूल फॉर एक्सलन्स पासदगाव, नांदेड येथे विद्यार्थ्यांसाठी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

मार्गदर्शनाचे मुख्य विषय : सायबर सुरक्षितता व सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, वाहतूक नियमांची माहिती व पालनाचे महत्त्व, सेल्फ डिफेन्स व आत्मविश्वास वाढविण्याचे उपाय, कायदे विषयक जनजागृती – मुला-मुलींसाठी आवश्यक माहिती, गुड टच – बॅड टच याविषयी जागरूकता, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम व व्यसनमुक्तीबाबत समुपदेशन, नैतिकतेचे महत्त्व आणि जबाबदार नागरिकत्व

ऑनलाइन तक्रार नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना QR कोडचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे ते कोणताही गैरप्रकार सहजपणे पोलिसांपर्यंत पोहोचवू शकतील.

मिशन निर्भया हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर जागरूकता वाढवण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना बळकट करत आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande