परभणी, 30 जुलै (हिं.स.)।
पाथरी तालुक्यातील हादगाव गावात शेतीचे, घरांचे आणि जनजीवनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील अनेक गावांत शेतीत पाणी साचल्याने पिकांचे नुकसान, घरांचे भगदाड, तसेच दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसामुळे उध्वस्त झालेल्या शेतजमिनी, घरांची पडझड, जनावरांचे हाल आणि खचलेली मनं – ही परिस्थिती मन हेलावणारी होती.या संकटाच्या क्षणी नागरिकांनी स्वतःला एकटे समजू नये, यासाठी सईद खान यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधून बाधितांना शक्य तेवढी तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. संकट कितीही मोठं असो, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपल्या सहकार्याने आणि एकजुटीने आपण हे संकट नक्कीच पार करू. अतिवृष्टीच्या या अंधारात, तुमच्यासोबत आशेचा दिवा घेऊन उभा आहे. असे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान शेतकऱ्यांना म्हणाले.
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis