अमरावती, 30 जुलै (हिं.स.) : नागपुरीगेट पोलिसांनी अकबर नगरातील एका कुख्यात आरोपीच्या घरातून २ तलवार, ३ सत्तुर व १ फरशासारखे घातक शस्त्र जप्त केले. जप्त केलेल्या शस्त्राची किमत ४ हजार ९०० रूपये आहे. याबाबत पोलिसांनी आरोपीवर नागपुरीगेट पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्टनुसार गुन्हे दाखल केले असून पोलिस पुढील तपास करित आहेत.फारुख उर्फ ब्लॅक शमशेर खान (३२) रा. अकबर नगर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. माहितीनुसार, नागपुरीगेट पोलिस ठाण्याचे ठाणेदार पीआय हनमंत उरलागोंडावर हे डीबीस्कॉडसह ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना त्यांना अकबर नगरातील फारूख खानच्या घरात मोठया प्रमाणात अवैध घातक शस्त्रसाठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पीआय उरलागोंडावर यांनी डीबीस्कॉडचे प्रमुख पीएसआय गजानन विधाते, एएसआय उपनिरीक्षक अहमद अली, संतोष यादव, दानिश शेख, राहुल रोडे, सागर पंडित, चालक आकाश कांबळे यांच्यासह मिळून तात्काळ फारूख खानच्या घरावर छाड टाकली. पोलिसांनी शमशेर खान याच्या घराची झडती घेतली असता पलंगाच्या आतील भागातलपवलेला अवैध शस्त्रसाठा आढळून आला. यात २ तलवारी, ३ सत्तूर व १ फरसा मिळून आला असून, याची एकूण किंमत अंदाजे ४,९०० रुपये इतकी आहे. सर्व शस्त्रे पोलिसांनी पंचासमक्ष जप्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी