नांदेड, 31 जुलै (हिं.स.)।
मौजे जामदरी, ता. भोकर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधी परिसरातील ग्रामपंचायतच्या मोकळ्या जागेत सभागृह उभारण्यासाठी आमदार निधीतून १५ लाख रुपये मंजूर केले असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाच्या भोकर मतदार संघाच्या आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे.
त्या म्हणाल्या की, भोकर मतदार संघात अधिकाधिक विकास कामे करण्याचा आपला मानस आहे. या विकास कामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले आहे.
विधानसभा मतदारसंघाची आमदार म्हणून स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मला मिळणाऱ्या निधीतून पहिला निधी जामदरी व रायखोड या दोन गावांना दिला आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis