अकोला जिल्हा स्त्री रुग्णालय निविदा प्रक्रियेत घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी
अकोला, 1 ऑगस्ट (हिं.स.)।अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभागासाठी (SNCU) 2024-25 मध्ये 31 पदांसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, या प्रक्रियेत गंभीर अपारदर्शकता आणि नियमबाह्य पद्धतीचा अवलंब झाल्याचा अहवाल समोर आल
P


अकोला, 1 ऑगस्ट (हिं.स.)।अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभागासाठी (SNCU) 2024-25 मध्ये 31 पदांसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, या प्रक्रियेत गंभीर अपारदर्शकता आणि नियमबाह्य पद्धतीचा अवलंब झाल्याचा अहवाल समोर आला आहे.मात्र हे हिमनगाचे टोक असून ह्यातील प्रशासकीय अधिकारी ए. एन. डांबरे ह्यांनी अनेक लोकांकडून नोकरी साठी पैसे घेऊन फसवणूक केली असून सर्व मोठ्या भ्रष्टाचाराचे मास्टर माईंड डांबरे आहेत.त्यामुळे ह्या घोटाळा प्रकरणात तातडीने गुन्हे दाखल करून तिन्ही अधिकारी अटक करण्यात यावे आणि जिल्हा स्त्री रुग्णालय येथील सर्व निविदा प्रक्रिया चौकशी करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्हा आणि महानगर वतीने आरोग्य उपसंचालक यांना

करण्यात आली आहे.

अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात निविदा घोटाळा चौकशीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जयंत पाटील आणि प्रशासकीय अधिकारी ए. एन. डांबरे यांच्याविरुद्ध गंभीर निष्कर्ष नोंदवले गेले. त्यामुळे तिन्ही अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.हा अधिकारी बचाव साठी केलेले नाटक आहे.चौकशीत जर अशा प्रकारच्या भ्रष्ट्राचार झाला असेल तर तात्काळ गुन्हे का नोंदविण्यात आले नाही? हा प्रश्न असून ह्यातील डांबरे हा अनेक घोटाळे आणि फसवणूक मध्ये सहभागी आहे.त्याने अनेक तरुण सुशिक्षित बेरोजगार तसेच महिला ह्यांची फसवणूक केली आहे.अनेक घोटाळे प्रकरणे त्याचा हात असून भ्रष्टाचार सिद्ध झाला आहे .मात्र त्याला वरिष्ठ पातळीवर अभय असल्याने चौकशी होत नव्हती.आता चौकशी समितीच्या अहवालानुसार, एकूण 72 निविदांपैकी केवळ 4 निविदाच अंतिम करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे त्या 4 निविदांपैकी केवळ 2 निविदाच अधिकृत घोषित करण्यात आल्या.उघडलेल्या निविदा तिन्ही अधिकारी ह्यांचे जवळचे लोकांना दिली आहेत. आपल्याच मर्जीतील व्यक्तींना कंत्राट मिळावे, यासाठी निविदा प्रक्रिया मध्ये दोन निविदाधारक असताना काम दिले गेले.हे अनेक वर्षे स्त्री रुग्णालय मध्ये सुरू आहे.त्यामुळे स्त्री रुग्णालय येथील सर्व निविदा प्रक्रिया, खरेदी प्रक्रिया, कंत्राटी पद्धतीने काम वाटप, ह्या सोबत स्त्री रुग्णालय येथील कामकाजाची चौकशी स्वतंत्रपणे केल्यास मोठा घोटाळा समोर येणार आहे. करीता ह्या प्रकरणात तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावे आणि आरोपींना अटक करावी.तसेच ह्या तिन्ही अधिकारी ह्यांचा पाच वर्षातील कॉल डेटा तपासून ते कुणा कुणाचे संपर्कात होते त्याचाही तपास करण्यात यावा, अशीही मागणी वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्हा महानगर तर्फे करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे,महानगर अध्यक्ष वैभव खडसे, सचिन शिराळे, आकाश सं. गवई, जय तायडे, साहिल बोदडे, सुरज दामोदर, आकाश जंजाळ आदी उपस्थित होते.आंदोलन छुप्या पद्धतीने करताना 5 कार्यकर्ते उप संचालक कार्यालयात गेले तर 50 कार्यकर्ते विधी महाविद्यालय जवळ काळा रंग घेऊन उभे होते पण उप संचालक अनुपस्थित असल्यामुळे घेराव घालून काळे फसण्याचा प्रयत्न यशस्वी होवू शकला नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande