चंद्रपूर, 31 जुलै (हिं.स.)।
वैधमापन शास्त्र यंत्रणेच्या कार्यपध्दतीत पारदर्शकता वाढविणे, लोकसंपर्क हढ करणे आणि ग्राहक तक्रारींचे, शंकेचे व सुचनेचे वेळेवर निराकरण करणे या उद्देशाने उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र कार्यालय चंद्रपुरच्या वतीने महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जनता दरबारचे आयोजन करण्यात येणार आहे.
सामान्य ग्राहक, ग्राहक संघटना, पॅकबंद वस्तुचे उत्पादक/पॅकर/आयातदार/किरकोळ विक्रेते व व्यापारी तसेच वजन व मापाचे परवाना धारक उत्पादक, दुरुस्तक व विक्रेते यांच्यासाह प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र, चंद्रपुर यांचे कार्यालय, रोहीत पेट्रोल पंपाजवळ, दुर्गापुर रोड, तुकुम, येथे आयोजित करण्यात येत आहे. तरी सर्व हितधारकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्र. उपनियंत्रक, जि.वा.मोरे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव