लंडन, 31 जुलै (हिं.स.)
भारत
आणि इंग्लंडचा अखेरचा कसोटी सामना द ओव्हलच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. ओल्ड
ट्रॅफर्ड येथे खेळला गेलेला चौथा कसोटी सामना बरोबरीत सोडवून भारताने पाच
सामन्यांची मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले होते. पाचव्या सामन्यात मालिका बरोबरीत
आणण्याच्या उद्देशाने आता टीम इंडिया मैदानात उतणार आहे. तर दुसरीकडे२-१ ने आघाडीवर असलेला इंग्लंड मालिका
जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही.
पाचव्या
कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सक्तीची विश्रांती
देण्यात येऊ शकते. आणि त्याच्याऐवजी आकाशदीप अथवा अर्शदीपची अंतिम अकरा क्रिकेटपटूंमध्ये
वर्णी लागण्याची शक्यता आहे. दुखापतग्रस्त यष्टीरक्षक ऋषभ पंतऐवजी ध्रुव जुरेलला
संघात स्थान मिळणार आहे. तर कुलदिप यादवचाही संघव्यवस्थापन विचार करण्याची शक्यता
आहे. तर इंग्लंडच्या संघाला कसोटी सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. कर्णधार बेन
स्टोक्स दुखापतीमपळे खेळू शकणार नाही. आणि जोफ्रा आर्चरला सक्तीची विश्रांती
देण्यात आली आहे.
आतापर्यंत
भारत आणि इंग्लंड यांच्यात द ओव्हल मैदानावर १४ कसोटी सामने खेळले गेले आहेत.
त्यापैकी टीम इंडियाने दोन सामने जिंकले आहेत.तर पाच सामने गमावले आहेत. सात कसोटी
अनिर्णित राहिल्या आहेत. १९७१ मध्ये या मैदानावर टीम इंडियाने इंग्लंडचा चार विकेट्सने
पराभव केला होता. त्यानंतर २०२१ मध्ये भारतीय संघाने १५७ धावांनी विजय मिळवला होता.
आता शुभमन गिलच्या संघालाही इतिहास रचण्याची नामी संधी आहे.
अखेरच्या
कसोटी सामन्यातपावसाचा व्यत्यय निर्माण होण्याची
शक्यता आहे.पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी
पावसाची शक्यता 65 टक्के आहे.तर ढगाळपणाची शक्यता 93 टक्के आहे. त्याचवेळीदुपारी वादळाची शक्यता देखील आहे.ढगाळपणाची
कमाल शक्यता 77 टक्के आहे. पण नाणेफेक
जिंकणारा संघ परिस्थितीमुळे प्रथम गोलंदाजी करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra