परभणी - जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कुणबी नोंदी शोध प्रशिक्षण मोहीम
परभणी, 31 जुलै, (हिं.स.)। मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून परभणी जिल्ह्यात कुणबी नोंदी शोध प्रशिक्षण मोहिमेच्या कार्यालयाचे उद्घाटन 1 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा कार्यालय शिवाजीनगर परभणी येथे करण्यात य
Manoj jarange


परभणी, 31 जुलै, (हिं.स.)। मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून परभणी जिल्ह्यात कुणबी नोंदी शोध प्रशिक्षण मोहिमेच्या कार्यालयाचे उद्घाटन 1 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा कार्यालय शिवाजीनगर परभणी येथे करण्यात येणार आहे. मराठा समाज बांधवांना प्रमाणपत्र काढण्यासाठी काही अडचणी येऊ नये म्हणून प्रत्येक तालुक्यात संपर्क कार्यालय उघडण्यात येणार आहेत. या कार्यालयात संपर्क साधून मराठा समाज बांधवांनी लवकरात लवकर आपले प्रमाणपत्र काढून घ्यावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी नेमलेल्या समितीचा कार्यकाळ पुन्हा वाढवला आहे. या अनुषंगाने परभणी जिल्ह्यात ज्या गावात कुणबी नोंदी सापडल्या आहेत किंवा भविष्यात पुन्हा आणखी नवीन गावात नोंदी सापडतील त्या गावातील मराठा समाज बांधवांना कुणबी प्रमाणपत्र लवकरात लवकर काढता यावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 1 ऑगस्ट 2025 रोजी कुणबी नाव शोध प्रशिक्षण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी मराठा प्रवाह समन्वय समिती जिल्हा कार्यालय परभणी येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यालयात नोंदी कशा शोधाव्या, मोडी लिपीचे प्राथमिक शिक्षण तसेच नाव निश्चित झाल्यानंतर पुढे कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे याचे संपूर्ण प्रशिक्षण दिले जाणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande