वॉशिंग्टन, 31 जुलै (हिं.स.)
लीग्स
कप २०२५ च्या पहिल्या सामन्यात इंटर मियामीचा सुपरस्टार लिओनेल मेस्सीने दोन
शानदार असिस्ट करत आपल्या संघाला ऍटलसविरुद्ध २-१ असा रोमांचक विजय मिळवून दिला.एमएलएस ऑल-स्टार गेममध्ये उपस्थित न
राहिल्यामुळे एका सामन्याच्या निलंबनानंतर तो आणि त्याचा सहकारी जॉर्डी अल्बा
मैदानावर परतले होते. सामन्याच्या शेवटच्या सेकंदात मेस्सीने मार्सेलो विगंटला
निर्णायक गोलसाठी असिस्ट केले. ज्यामुळे इंटर मियामीला विजय मिळाला.
सामन्याचा
पहिला गोल ५८ व्या मिनिटाला झाला जेव्हा मेस्सीने टेलास्को सेगोव्हियाला पास देऊन
गोलिंगची सुरुवात केली. त्यानंतर८२
व्या मिनिटाला रिवाल्डो लोझानोने ऍटलससाठी बरोबरीचा गोल केला.पण ९६ व्या मिनिटालाविगंटने निर्णायक गोल केला जो सुरुवातीला ऑफसाइड म्हणून घोषित करण्यात आला
होता. पण व्हिडिओ असिस्टंट रेफ्रीने पुष्टी
दिल्यानंतर तो गोल वैध घोषित करण्यात आला.
या
विजयासह, जुलैमध्ये मेस्सीच्या एकूण असिस्टची
संख्या पाच झाली आहे. त्याने या महिन्यात आठ गोल देखील केले आहेत.ज्यामुळे त्याला मेजर लीग सॉकर प्लेअर ऑफ
द मंथ म्हणून निवडण्यात आले. या काळात इंटर मियामीने एमएलएसमध्ये ४ विजय, १ पराभव आणि एका सामन्यात बरोबरी साधली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra