लंडन, 31 जुलै (हिं.स.)
भारत
आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स म्हणडे डब्ल्यूसीएल २०२५
चा उपांत्य फेरीचा सामना रद्द करण्यात आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर
भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला. दोन्ही संघ बर्मिंगहॅममधील
एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर एकमेकांसमोर येणार होते.
सामना
रद्द झाल्यामुळेपाकिस्तान अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. पाकिस्तानने सलग
दुसऱ्यांदा डब्ल्यूसीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानच्या
संघालाअंतिम फेरीत भारताकडून पराभव पत्करुन
उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
डब्ल्यूसीएलने
सामना रद्द झाल्याची पुष्टी करणारे निवेदन जारी केले. आयोजकांनी भारताच्या उपांत्य
फेरीतून माघार घेण्याच्या निर्णयाचा आदर केला आणि पाकिस्तानची खेळण्याची इच्छा
मान्य केली. आयोजकांनी अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, भारताच्या माघारमुळे
पाकिस्तान चॅम्पियन्स संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे.डब्ल्यूसीएलमध्ये, आम्ही नेहमीच खेळाच्या शक्तीवर विश्वास
ठेवला आहे. जे जगाला प्रेरणा देते आणि सकारात्मक बदल घडवून आणते. पणचाहत्यांच्या भावनांचा नेहमीच आदर केला
पाहिजे.शेवटीआम्ही जे काही करतो ते आमच्या प्रेक्षकांसाठी आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
शिखर
धवन, इरफान पठाण, हरभजन सिंग, युवराज
सिंग, सुरेश रैना आणि इतर क्रिकेटपटूंनी
पाकिस्तानविरुद्धच्या नॉकआउट सामन्यात खेळण्यास नकार दिला होता
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra