ठाण्यात विक्रम होणार; सराव दहीहंडीत लागणार नऊ थर
ठाणे, 31 जुलै (हिं.स.)।दहीहंडीची पंढरी समजल्या जाणाऱ्या ठाणे नगरीत येत्या रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक राजेश वायाळ (पाटील) यांनी सराव दहीहंडीचे आयोजन कोपरीतील अष्टविनायक चौकात केले आहे. युवासेनेच्या या
ठाण्यात विक्रम होणार; सराव दहीहंडीत लागणार नऊ थर


ठाणे, 31 जुलै (हिं.स.)।दहीहंडीची पंढरी समजल्या जाणाऱ्या ठाणे नगरीत येत्या रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक राजेश वायाळ (पाटील) यांनी सराव दहीहंडीचे आयोजन कोपरीतील अष्टविनायक चौकात केले आहे. युवासेनेच्या या निष्ठेच्या हंडीमध्ये नावाजलेल्या मंडळांची गोविंदा पथके नऊ थर लावण्याचा प्रयत्न करणार असुन यावेळी दादुस आला रे... या कार्यक्रमाची धूम ठाणेकरांना पहावयास मिळणार आहे. अशी माहिती राजेश वायाळ (पाटील) यांनी बोलताना दिली.

श्रावणसरींच्या वर्षावात हिंदु संस्कृतीच्या सण उत्सवांना प्रारंभ झाला आहे. ठाण्यात तर मोठ्या उत्साहात दहीहंडीचा सण साजरा होत असतो. टेंभी नाक्यावरील धर्मवीर आनंद दिघे यांची मानाची दहीहंडी, शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांची जांभळी नाक्यावरील आनंद चॅरिटेबल ट्रस्टची दहीहंडी यासह अनेक नामांकित दहीहंड्याचे आयोजन ठाण्यात केले जात असल्याने बालगोपाळांचा थरांचा सराव ठिकठिकाणी सुरू झाला आहे.

गोविंदांच्या या सरावाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच दहीहंडीच्या पुर्वतयारीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेने पुढाकार घेतला आहे. युवासेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक तथा कोपरी- पाचपाखाडी विधानसभा क्षेत्राचे युवा अधिकारी राजेश रामदास वायाळ (पाटील) यांच्या माध्यमातून ठाणे (पूर्व) कोपरीतील अष्टविनायक चौकात भव्य स्वरूपात निष्ठेची दहीहंडी आयोजित केली आहे. रविवार दिनांक ०३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते रात्रौ १० वाजेपर्यंत होणाऱ्या या सराव दहीहंडीत मुंबई - ठाण्यासह विविध ठिकाणची गोविंदा पथके उपस्थिती दर्शवुन चित्तथरारक थर लावणार आहेत. ह्या सराव दहीहंडीत नऊ थरांचा विक्रम करण्याचा प्रयत्न गोविंदा पथके करणार असुन या गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, ज्येष्ठ माजी नगरसेवक नरेश मणेरा तसेच, सुभाष म्हसकर आदींसह शिवसेनेचे अनेक मान्यवर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती आयोजक राजेश वायाळ (पाटील) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande