परभणी, 31 जुलै (हिं.स.)।
भाग्यनगर गृहनिर्माण संस्था, वसमत रोड, परभणी यांच्या वतीने भाग्यनगरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोरील ओपन स्पेसमध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला.
पर्यावरण संरक्षण व हरित परभणीच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या कार्यक्रमात एकूण ५० वृक्षांची लागवड करण्यात आली. लावण्यात आलेल्या वृक्षांमध्ये ३० कडुलिंब, १० पिंपळ, १० वड व इतर फुलझाडांचा समावेश होता. या उपक्रमामुळे परिसरात हरित वातावरण निर्मिती होण्यास मदत होणार आहे.
सदर वृक्षारोपण उपक्रमामुळे भाग्यनगर परिसरात पर्यावरण जागरूकतेला चालना मिळाली असून, भविष्यात आणखी असे उपक्रम राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis