मुंबई, 31 जुलै, (हिं.स.)। आज मालेगाव बॉम्बब्लास्ट प्रकरणातील सर्व ७ आरोपींना कोर्टाने निर्दोष घोषित केलं. ही केवळ एक न्यायालयीन निकालाची बातमी नाही, तर काँग्रेसच्या विषारी आणि विखारी राजकारणाचा चेहरा पुन्हा उघड झाला आहे. त्यांच्या मोहोब्बतच्या दुकानात तुष्टीकरणाच्या , द्वेषाच्या गोळ्या मिळतात हे चव्हाट्यावर आलं आहे. सत्य परेशान हो सकता है पर पराजित नही, असे प्रतिपादन भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा किशोर वाघ यांनी केले आहे.
त्या म्हणाल्या, हिंदू साध्वींना, राष्ट्रासाठी लढणाऱ्या अधिकाऱ्यांना खोट्या पुराव्यांत अडकवण्यात आलं. का? एका विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी? का विशिष्ट लोकांची पापं लपवण्यासासाठी…? ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द प्रचारात आणणाऱ्यांनी देशाच्या सामाजिक ऐक्यालाच गालबोट लावणाऱ्या काँग्रेसला आज कायद्याचा दणका मिळाला आहे. आज या विकृत कॉंग्रेसला संविधानाचा खरा अर्थ समजेल …कारण संविधानाच्या आधारावरच सत्याचा विजय झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर