‘वंदे भारत’ मुंबई-सोलापूर आता २० डब्यांची
पुणे, 31 जुलै (हिं.स.)। पुण्याहून धावणाऱ्या मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या वाढणार आहे. रेल्वे प्रशासनाने मुंबई-नांदेड वंदे भारत आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेससाठी एकत्र (इंटिग्रेशन) रेक वापरण्याचा निर्णय घेतला आ
Vande Bharat newsfro today newss


पुणे, 31 जुलै (हिं.स.)। पुण्याहून धावणाऱ्या मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या वाढणार आहे. रेल्वे प्रशासनाने मुंबई-नांदेड वंदे भारत आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेससाठी एकत्र (इंटिग्रेशन) रेक वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला २० डब्यांचा रेक मिळणार आहे. या रेल्वेला सध्या १६ डबे आहेत. चार डबे वाढणार असल्याने तब्बल ३१२ प्रवाशांची सोय होणार आहे. २९ ऑगस्टपासून हा बदल लागू होणार आहे.

मुंबई-सोलापूरदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला सोलापूर ते पुणेदरम्यान तुलनेने कमी प्रतिसाद मिळत आहे; तर पुणे ते मुंबईदरम्यान या गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. शनिवारी आणि रविवारी तर या सेक्शनमध्ये प्रवाशांचे वेटिंग सुरू आहे. त्यामुळे डब्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय पुणे आणि मुंबईच्या प्रवाशांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. चेअर कार प्रकारच्या डब्यांची संख्या वाढणार आहे. या डब्यात ७८ प्रवाशांची आसन क्षमता आहे. चार डबे वाढणार असल्याने ३१२ अतिरिक्त प्रवाशांची सोय होणार आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande