शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले - अमित शाह
पुणे, 4 जुलै (हिं.स.)। पुण्याची भूमी ही स्वराज्याच्या संस्काराचे उगमस्थान आहे, शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले. मराठा साम्राज्याचे तुकडे झाल्यानंतर पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले, अफगाणिस्तानपासून बंगाल कटकपर्यंत साम्राज्याचा विस्तार केला, थोर
Amit shaa news pune BJP


पुणे, 4 जुलै (हिं.स.)। पुण्याची भूमी ही स्वराज्याच्या संस्काराचे उगमस्थान आहे, शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले. मराठा साम्राज्याचे तुकडे झाल्यानंतर पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले, अफगाणिस्तानपासून बंगाल कटकपर्यंत साम्राज्याचा विस्तार केला, थोरले बाजीराव पेशवे 41 युद्धे लढले पण एकही हारले नाहीत. निजामाविरुद्ध पालखेडचा मराठ्यांचे युद्ध अविश्वसनीय होते, असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातील कार्यक्रमात शहा बोलत होते.

थोरले बाजीराव पेशवे यांचा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. त्याच्या अनावरण सोहळ्याला केंद्रीय मंत्री भाजप नेते अमित शाह हे उपस्थित होते. यावेळी अमित शाह यांनी बाजीराव पेशवे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले.

युद्धाच्या कलेचा भाव केवळ बाजीराव पेशवा यांच्यातच होता. १९ वर्षाच्या वयात शाहू महाराजांनी त्यांना कशा पद्धतीने सिलेक्ट केलं असेल मला माहीत नाही. तेव्हा खूप आव्हान होतं. शाहू महाराजांनी बाजीराव पेशवांची निवड केली. त्यांनी २० वर्षात ४१ युद्ध लढले. एकही युद्ध हरले नाही. हे रेकॉर्ड कोणत्याच सेनापतीचं नाही. एका वर्षात दोन युद्ध होते. त्याकाळी पावसाळ्यात चार महिन्यात युद्ध व्हायचे नाही. म्हणजे ८ महिन्यात दोन युद्ध करून जिंकले. असे ते वीर सेनानी असल्याचे अमित शाह म्हणाले.

पुढे शाह असेही म्हणाले की, शिवाजी महाराजांनी स्वराज्याची कल्पना केली असेल तेव्हा भारताचा भूगोल. त्यावेळचा भारताच्या साम्राज्याचा इतिहास पाहिल्यावर १२ वर्षाच्या मुलाने काय विचार केला असेल याचा विचार करा. पूर्ण दक्षिण भारत मोगलांमुळे पीडित होता. उत्तर मुगलांच्या आधीन होता. त्यावेळी १२ वर्षाच्या मुलाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हा अकल्पनीय पराक्रम होता. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचीच केवळ स्थापना केली नाही. तर राज्यभरातील तरुणांच्या मनात स्वराज्याची कल्पना रुजवली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande