मुंबई, 5 जुलै (हिं.स.)। सारा अली खान आणि आदित्य रॉय कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मेट्रो... इन दिनों’ अखेर शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. अनुराग बासू दिग्दर्शित या मल्टीस्टारर चित्रपटाला प्रेक्षक व समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.
चित्रपटात फातिमा सना शेख, अली फज़ल, नीना गुप्ता, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी आणि अनुपम खेर यांसारखे कलाकार असूनही पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून स्पष्ट होते की चित्रपटाला ओपनिंगमध्ये अपेक्षित यश मिळालेले नाही. रोमँस आणि भावनांनी भरलेला हा म्युझिकल ड्रामा चित्रपट एकाचवेळी अनेक कथा मांडण्याचा प्रयत्न करतो.
पहिल्या दिवशी एवढी कमाई
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सैकनिल्कच्या अहवालानुसार, ‘मेट्रो... इन दिनों’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी (शुक्रवारी) सुमारे 3.35 कोटी रुपये कमावले. अंदाजे 85 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट असल्याने ही कमाई सरासरीच मानली जात आहे. अनुभवी दिग्दर्शक आणि नावाजलेल्या कलाकारांच्या उपस्थितीतही चित्रपटाची ओपनिंग काहीशी निराशाजनक ठरली आहे.
एडव्हान्स बुकिंगही ठरली फिकी
चित्रपटाच्या एडव्हान्स बुकिंगला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. केवळ 50-60 लाख रुपये इतकीच कमाई एडव्हान्स बुकिंगमधून झाली आहे. समीक्षक व प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिक्रियाही संमिश्र आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष वीकेंडच्या कमाईकडे लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर