केरळ क्रिकेट लीगमध्ये संजू सॅमसन सर्वात महागडा क्रिकेटपटू
तिरुवनंतपुरम, 5 जुलै, (हिं.स.) केरळचा फलंदाज आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन केरळ क्रिकेट लीगमध्ये सर्वात महागडा क्रिकेटपटू ठरला आहे.भारतातील जवळजवळ सर्वच क्रिकेट राज्य संघटना त्यांच्या स्वतःच्या लीगचे आयोजन करत आह
संजू सॅमसन


तिरुवनंतपुरम, 5 जुलै, (हिं.स.) केरळचा

फलंदाज आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन केरळ क्रिकेट लीगमध्ये सर्वात

महागडा क्रिकेटपटू ठरला आहे.भारतातील जवळजवळ सर्वच क्रिकेट राज्य संघटना

त्यांच्या स्वतःच्या लीगचे आयोजन करत आहेत. केरळ क्रिकेट लीगचे आयोजन देखील

केरळमध्ये केले जात आहे. या लीगचा पहिला हंगाम २०२४ मध्ये झाला होता. आता दुसरा

हंगाम आयोजित केला जाणार आहे. त्याआधी खेळाडूंचा लिलाव करण्यात आला.

केरळ

क्रिकेट लीगच्या लिलावात कोची ब्लू टायगर्सने संजू सॅमसनला खरेदी करण्यासाठी २६.८

लाख रुपये खर्च केले. यासह संजू केसीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा क्रिकेटपटू

ठरला आहे. संजू सॅमसनने मागील केसीएल हंगामातील विक्रम मोठ्या फरकाने मोडला. मागील

विक्रम ७.४ लाख रुपयांचा होता. त्रिवेंद्रम रॉयल्सने एमएस अखिलला खरेदी करत या

विक्रमाची नोंद केली होती. ३० वर्षीय सॅमसन गेल्या वर्षी स्पर्धेच्या पहिल्या हंगामात

खेळू शकला नव्हता.

केरळ

क्रिकेट लीगचा दुसरा हंगाम २२ ऑगस्टपासून सुरू होईल. ७ सप्टेंबर रोजी विजेतेपदाचा

सामना खेळवला जाईल. टी-२० लीगमध्ये सहभागी होणाऱ्या सहा फ्रँचायझींमध्ये कोल्लम

सेलर्स, कालिकट

ग्लोबस्टार्स, अलेप्पी

रिपल्स, कोची

ब्लू टायगर्स, त्रिशूर

टायटन्स आणि त्रिवेंद्रम रॉयल्स यांचा समावेश आहे. पहिल्या हंगामात लिलावात सहभागी

झालेल्या १६८ क्रिकेटपटूंमधून ११४ क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली. प्रत्येक

फ्रँचायझीने लिलावात सरासरी ४० लाख रुपये खर्च केले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande