वैभव सूर्यवंशीचे इंग्लंडविरुद्ध धडाकेबाज शतक
लंडन, 5 जुलै (हिं.स.) वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. वॉर्सेस्टरशायर येथे झालेल्या इंग्लंडच्या १९ वर्षाखालील संघाविरुद्धच्या पाच साम
वैभव सूर्यवंश


लंडन, 5 जुलै (हिं.स.)

वैभव

सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात

जलद शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. वॉर्सेस्टरशायर येथे झालेल्या इंग्लंडच्या

१९ वर्षाखालील संघाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील सामन्यात वैभवने फक्त

५२ चेंडूत १० चौकार आणि ७ षटकारांसह शतक झळकावले. वैभवने त्याच्या शतकातून फक्त

चौकार आणि षटकारांसह ८१ धावा केल्या आहेत.

वैभव

सूर्यवंशीपूर्वी पाकिस्तानच्या कामरान गुलामच्या नावावर हा होता. कामरानने ५३ चेंडूत शतक पूर्ण केले होते. दरम्यान, वैभव सूर्यवंशीने ७८ चेंडूत १३ चौकार आणि १० षटकारांसह १४३ धावा केल्या. या शतकी

खेळीपूर्वी खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये वैभवने आपल्या फलंदाजीने इंग्लिश

गोलंदाजांचा चांगलाचा समचार घेतला होता. मात्र, वैभवला या वेगवान खेळीचे शतकात

रूपांतर करता आले नव्हते.

इंग्लंडविरुद्धच्या

चौथ्या सामन्यात मात्र, त्याने याची भरपाई केली. पहिल्या ३ सामन्यांमध्ये वैभवने

१९ चेंडूत ४८ धावा, ३४ चेंडूत ४५ धावा आणि तिसऱ्या सामन्यात ३१ चेंडूत ८६ धावा केल्या.

वैभवने तिसऱ्या सामन्यातील आपली लय कायम राखली. आणि १४३ धावांची तुफानी खेळी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande