जळगाव - कारागृहात बंदीवान कैद्याकडून कर्मचाऱ्यास मारहाण
जळगाव , 6 जुलै (हिं.स.) जळगाव येथील उपजिल्हा कारागृहातून बाहेर काढलेल्या एका कैद्याने परत बॅरेकमध्ये जाण्यास नकार देत कारागृह कर्मचाऱ्याला मारहाण केली. हर्षद रब्बी पटेल (२१, रा. सुप्रिम कॉलनी) असं कैद्याचे नाव असून अंबादास जुलाल देवरे (४०, रा. काराग
जळगाव - कारागृहात बंदीवान कैद्याकडून कर्मचाऱ्यास मारहाण


जळगाव , 6 जुलै (हिं.स.) जळगाव येथील उपजिल्हा कारागृहातून बाहेर काढलेल्या एका कैद्याने परत बॅरेकमध्ये जाण्यास नकार देत कारागृह कर्मचाऱ्याला मारहाण केली. हर्षद रब्बी पटेल (२१, रा. सुप्रिम कॉलनी) असं कैद्याचे नाव असून अंबादास जुलाल देवरे (४०, रा. कारागृह वसाहत) असं मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी कैद्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा कारागृहात बंदीवान म्हणून असलेला हर्षद पटेल याच्यासह काही बंद्यांना बॅरेकच्या बाहेर काढण्यात आले होते. बॅरेकमध्ये परत जाण्याची वेळ झाली असता, कर्मचारी अंबादास देवरे यांनी पटेलला बॅरेकमध्ये परत जाण्यास सांगितले. मात्र, पटेलने ऐकले नाही. “माझी न्यायालयाची तारीख आहे, मला तारखेवर पाठवा,” अशी अट त्याने घातली. यावर सुभेदार सुभाष खांडरे यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पोलीस पथक उपलब्ध नसल्याने आज त्याला तारखेवर नेता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तरीही हर्षद पटेल काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला पुन्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असताना, तो अचानक बेभान झाला. त्याने शिवीगाळ करत कर्मचारी देवरे यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली आणि मारहाणही केली. उपस्थित इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने मध्यस्थी करत देवरे यांना त्याच्या तावडीतून सोडवले. या गंभीर प्रकरणी कर्मचारी अंबादास देवरे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली हर्षद पटेलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande