अहिल्यानगर : घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद
अहिल्यानगर, 6 जुलै (हिं.स.)। घरफोडी करणारी आंतर जिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आली असून आरोपीकडून 250 ग्रॅम सोन्यासह 24 लाख 26 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घरफोडी करणारी आंतर जिल्हा टोळी जेरबंद झाल्याने अ
घरफोडी करणारी आंतर जिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद


अहिल्यानगर, 6 जुलै (हिं.स.)।

घरफोडी करणारी आंतर जिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आली असून आरोपीकडून 250 ग्रॅम सोन्यासह 24 लाख 26 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घरफोडी करणारी आंतर जिल्हा टोळी जेरबंद झाल्याने अहिल्यानगर, सातारा, नाशिक, पुणे येथील 16 घरफोडीच्या गुन्हयांची उकल झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी आहे की, 20 जून रोजी फिर्यादी शालिनी बाळशीराम शेळके, वय 50, रा.बोटा, ता. संगमनेर या त्यांचे राहते घर बंद करून बाहेर गावी गेल्या असताना अज्ञात चोरटयांनी त्यांचे राहते घराचे कुलूप तोडून घरामधून सोन्याचे दागीने चोरून नेले.याबाबत घारगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. 200/2025 बीएनएस कलम 305 (अ), 351 (3), 331 (4) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना जिल्हयातील उघडकीस न आलेल्या घरफोडीच्या गुन्हयांचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोउपनि/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, सुनील मालणकर, भगवान थोरात, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, भगवान धुळे व भाग्यश्री भिटे अशांचे पथक नेमुण गुन्हयाचा तपास करणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले. या पथकास गुन्ह्याचे तपासात घारगाव पोलीस स्टेशनला दाखल असलेला गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे मिलींद उर्फ मिलन ईश्वर भोसले रा. बेलगांव, ता. कर्जत याने त्याचे साथीदारासह केल्याची माहिती प्राप्त झाली.

मिळालेल्या माहितीवरून पथकाने कर्जत तालुक्यात आरोपीतांचा शोध घेऊन 1) मिलींद उर्फ मिलन ईश्वर भोसले, वय 28, रा.बेलगाव, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर 2) सुनिता उर्फ सुंठी देविदास काळे, वय 35, रा.नारायण आष्टा, ता.आष्टी, जि.बीड 3) एक विधीसंघर्षित बालक, वय 17, रा.बेलगाव, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.ताब्या तील आरोपी मिलींद ईश्वर भोसले याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस त्याने सदरचा गुन्हा त्याचे वरील साथीदारसह 4) शुभम उर्फ बंटी पप्पु काळे रा.एम.आय.डी. सी. अहिल्यानगर (फरार) 5) सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले रा. बेलगांव, ता. कर्जत (फरार), 6) संदीप ईश्वर भोसले रा. सदर (फरार), 7) कुऱ्हा ईश्वर भोसले रा. सदर (फरार) अशांनी मिळून त्यांचेकडील दोन मोटार सायकल वरून बंद घराची पाहणी करुन घरफोडीचा गुन्हा केल्याची माहिती सांगीतली.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande