नाशिक - सोनसाखळी चोरणाऱ्या दोघांना अटक
नाशिक, 10 ऑगस्ट, (हिं.स.)। - गुजरातमधून नाशिकमध्ये येत इंदिरानगरमध्ये चेन स्नॅचिंगसाठी सावज धुंडाळताना इंदिरानगर पोलिसांनी थरारक पाठलाग करून जेरबंद केले आहे. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच अॉगस्टला चेन स्नॅचिंग केल्याची कबुली त्यांनी दिली असून
गुजरात वरून येत नासिक मध्ये होत होती सोनसाखळी दोघांना अटक


नाशिक, 10 ऑगस्ट, (हिं.स.)।

- गुजरातमधून नाशिकमध्ये येत इंदिरानगरमध्ये चेन स्नॅचिंगसाठी सावज धुंडाळताना इंदिरानगर पोलिसांनी थरारक पाठलाग करून जेरबंद केले आहे. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच अॉगस्टला चेन स्नॅचिंग केल्याची कबुली त्यांनी दिली असून दोघांवर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान अशा चार राज्यांत अतिशय गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर दिनेश बजंरगे (वय – ४०) व जिग्नेश उर्फ जुगनू दिनेश घासी (वय ४२) अशी दोघा संशयितांची नावे असून ते अहमदाबादमधील छारानगर, कुबेरनगर रेल्वेस्टेशन, सरदारग्राम येथील आहेत. दोन्ही आरोपी हे आंतरराज्यीय टोळीचे सदस्य असुन त्यांचेवर वैयक्तिक तसेच टोळीने केलेले विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.

इंदिरानगरसह शहरातील विविध भागात चेन स्नॅचिंग सारख्या घटना रोखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त (परिमंडळ - २) किशोर काळे, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांनी हद्दीमध्ये सतर्क गस्त करुन चेन स्नॅचिंग तसेच इतर गुन्हे होणार नाहीत, याबाबत सतर्क पेट्रोलिंग करणेबाबत व पेट्रोलिंगदरम्यान संशयित इसमांवर स्टॉप अॅण्ड सर्च, टवाळखोरांवर कारवाई करणे बाबत मोहिम राबविणेबाबत आदेशित केले होते. त्यानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे व सहायक निरीक्षक (गुन्हे) सुनिल अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने स्टॉप अॅण्ड सर्च, टवाळखोर कारवाई व सतर्क गस्त सुरु केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande