नेरळ, 11 ऑगस्ट (हिं.स.)। नेरळ पोलीस ठाण्यात मध्यरात्री गोपनीय फोन आला आमच्या वाडीत अंमली पदार्थ बनवीत आहेत आपण लगेच या या अनुशांगाने प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे व पोलीस टीम घटना स्थळी तातडीने पोचली व ग्रामस्थांमुळे हा मोठा अनर्थ टळला आहे. ताडवाडी येथे नेरळ पोलिसांची धडक कारवाई करत या दुर्गम भागात अंमली पदार्थ बनवणाऱ्या टोळी पकडण्यात यश आले आहे.
रात्रीच्या वेळेस सुरू असलेल्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून सतर्क ग्रामस्थांनी पाच जणांना रंगेहाथ पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केले. त्या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली. ताडवाडीतील माळावरील काही घरांमध्ये काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास हालचाली वाढल्या होत्या. ग्रामस्थांना या हालचालींवर संशयाला यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता घराबाहेर बर्फाच्या लाद्यांचा मोठा साठा दिसला, आत डोकावून पाहिल्यावर काही अनोळखी व्यक्ती रसायन आणि इतर साहित्य आढळलं. यासोबतच परिसरात पसरलेला उग्र वास यामुळे नेमकं या घरात काय सुरू आहे याचा प्रश्न ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तींना विचारला असता त्यांनी अरेरावी केली व अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केला.
ग्रामस्थांनी एकत्र येऊन पाच जणांना पकडून पोलिसांच्या हवाली केल आणि सुरू असलेला अवैध प्रकार समोर आला. या प्रकाराची माहिती मिळतात नेरळ पोलीस तातडीने घटना स्थळी दाखल झाले. दरम्यान तिथे संशयास्पद हालचाली सुरू असल्याने अंमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य पोलिसांना या ठिकाणी आढळून आले या गंभीर प्रकरणाची दखल घेत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच घटनास्थळावरून अंमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल आणि एक चार चाकी वाहन जप्त करण्यात आले. दरम्यान आढळून आलेल्या कच्चामाल नेमका कोणत्या अंमली पदार्थासाठी होता तसेच यामध्ये आणखी कोणाचा हात आहे का? याचा शोध आता नेरळ पोलीस तसेच फॉरेन्सिक टीम करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sandesh Jaywant