सोलापूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)।
मूळ मालकाच्या परस्पर 2001 ते 2017 या कालावधीत पापरी ता मोहोळ येथील जमिनीची तीन वेळा बेकायदेशीर व बोगस रीत्या वेगवेगळ्या खरेदी करून, मोहोळ येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे बनावट व बोगस दस्त ऐवज करून सातबारा उताऱ्याच्या कब्जेदार सदरी नोंद करून फसवणूक केल्या प्रकरणी,मोहोळ पोलीसात नऊ जणा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, गोरक्षनाथ कोंडीबा टोणपे रा पापरी सध्या रा. शिवाजीनगर, सिडको जि. संभाजीनगर यांची शेत जमीन पापरी ता. मोहोळ येथे असून, ते वयोवृद्ध आहेत. त्यांना सांधे दुखीचा त्रास असल्याने ते प्रवास करीत नाहीत. म्हणून त्यांनी पापरी येथील त्यांच्या मालकीचे शेत जमीन गट नंबर 23 मधील 1 हेक्टर 32 आर या जमिनीचे मिळकती बाबत कुलमुखत्यार म्हणून विलास इंद्रजीत भोसले रा. पापरी यांना अधिकार दिले आहेत.
या प्रकरणी विलास इंद्रजीत भोसले रा पापरी सध्या रा पंढरपुर यांनी मोहोळ पोलीसात फिर्याद दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष चव्हाण हे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड