जालना, 11 ऑगस्ट (हिं.स.)।
पोलीस ठाणे कोतवाली जिल्हा मैनपुरी आग्रा विभाग राज्य उत्तर प्रदेश येथे दिनांक 09/07/2025 रोजी गु.र.नं.506/2025 कलम 137 (2), 37 भा. न्या. संहिता 2023 नुसार फिर्यादी नामे ध्रुव सिंह लखन सिंह व्यवसाय पोलीस उपनिरीक्षक पोलीस लाईन मैनपुरी राज्य उत्तर प्रदेश यांनी त्यांची अल्पवयीन मुलगी ही आरोपी आयाज अन्सारी, मकसुद अन्सारी , फैजान अन्सांरी सर्व रा. गोलाबाजार मैनपुरी यांनी 16 वर्ष अल्पवयीन मुलीस फुस लावुन बळजबरीने पळवुन नेल्याचे गुन्हा दाखल केला होता.
उत्तर प्रदेश येथील कोतवाली पोलीस ठाणे व चंदनझिरा पोलीस स्टेशनचे पोउपनि/मारियो स्कॉट व टिम यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शाखाली गुन्ह्याचे गांभिर्य ओळखुन चंदनझिरा भागात बातमीदार नेमुन खात्रीशीर माहिती प्राप्त करुन अत्यंत गुप्त पद्धतीने नियोजनबध्दरित्या आरोपींचा मार्ग काढत गुन्ह्यातील आरोपी फैजान मकसूद अन्सांरी , आयाज मकसूद अन्सांरी रा. गोलाबाजार मैनपुरी राज्य उत्तर प्रदेश यांना चंदनझिरा भागात ताब्यात घेवुन व त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल चौकशी करुन पोलीस खाक्या दाखवुन त्यांच्यासोबत फुस लावुन पळवुन आणलेल्या 16 वर्ष वय असलेल्या अल्पवयीन मुलीचाही शोध लावला. पुढील योग्य त्या कायदेशीर कार्यवाही कामी दोन्ही आरोपी व अल्पवयीन मुलीस कोतवाली पोलीस ठाणे मैनपुरीचे पोलीस उपनिरीक्षक श्री. दिनेश कुमार यांच्या ताब्यात देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / KULKARNI AMIT ANIL