अमरावतीत 6 महिन्यांच्या बालिकेचे अपहरण, गुन्हा दाखल
अमरावती, 11 ऑगस्ट (हिं.स.)शहरातील एका खासगी स्णालयात एका महिलेने मुलीला जन्म दिला. मुलगी सहा महिन्याची झाल्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनीच मुलगी त्यांची असल्याचा दावा केल्यामुळे जन्म देणाऱ्या आईच्या पायाखालची वाळू सरकली. तिने तत्काळ राजापेठ ठाण्यात धा
अमरावतीत 6 महिन्यांच्या बालिकेचे अपहरण, गुन्हा दाखल


अमरावती, 11 ऑगस्ट (हिं.स.)शहरातील एका खासगी स्णालयात एका महिलेने मुलीला जन्म दिला. मुलगी सहा महिन्याची झाल्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनीच मुलगी त्यांची असल्याचा दावा केल्यामुळे जन्म देणाऱ्या आईच्या पायाखालची वाळू सरकली. तिने तत्काळ राजापेठ ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. अखेर तांत्रिक पेचात पडलेल्या प्रकरणात पोलिसांनी मुलीचा दावा करणाऱ्या दाम्पत्याविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ३४ वर्षीय गर्भवती महिलेचा शहरातील एका स्त्रीरोग तज्ज्ञांकडे उपचार सुरु होता. ६ ते ७ महिने उपचार घेतल्यानंतर महिलेच्या नणदेने तिला साईनगरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घ्यायला सांगितले. त्यामुळे महिलेने साईनगरातील खासगी रुग्णालयात उपचार घेतला. त्यानंतर १७ फेब्रुवारी २०२५ रोजी महिलेची डॉ. मोनाली कळंबे- बोडे यांच्या रुग्णालयात प्रसुती झाली. तिने एका मुलीला जन्म दिला. मुलगी सहा महिन्यांची झाल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात राहणारी महिलेची नातेवाईक अमरावतीत आली. सहा महिन्यांच्या मुलीला सोबत आठ दिवसांकरिता घेऊन जाते, असे सांगून ती चिमुकलीला घेऊन गेली. आठ दिवस झाले तरी नातेवाईकांनी मुलीला परत आणले नाही. त्यामुळे मुलीच्या आईने त्यांना मुलीला आणून देण्यासाठी फोन केला. संबंधित महिलेने फोन रिसिव्ह केला नाही. त्यामुळे जन्म देणाऱ्या आईपासून चिमुकली दूर राहिली. अखेर मुलीची आई तिच्या पतीसह तीन महिने दूर काही दिवसांपूर्वी मुलीला आणण्याकरिता महिलेच्या घरी गेली. परंतु तिने मुलगी परत न करता वाद घातला. तसेच नजिकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रार दिल्याची माहिती मिळताच जन्मदात्या बाळाची आई-वडिलांनी तत्काळ संबंधित ठाण्यात पोहोचले. विचारपुस केली असता ज्या महिलेने बाळाचे अपहरण केले त्या महिलेच्या पतीचे नाव मुलीच्या नावासमोर लावल्याचा कागद दाखविला. तसेच जन्माला आलेल्या मुलीचे आधारकार्डसुद्धा त्याच नावाने केले होते. हे पाहताच जन्म देणाऱ्या महिलेसह तिच्या पतीच्या पायाखालची वाळू सरकली. तेव्हा लगेच त्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. तसेच गरोदरपणाच्या काळात संशयित महिला नातेवाइकाने स्वतःच्या नावाने दस्तऐवज तयार करून मुलीचे आधारकार्ड व जन्मप्रमाणपत्र तयार करून तिला बळजबरीने ताब्यात ठेवले, असा आरोप राजापेठ ठाण्यात दाखल तक्रारीत केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande