पालघर येथे लाचखोर महिला लोकसेविकेला अटक
पालघर, 12 ऑगस्ट (हिं.स.)।महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमेद अभियान योजनेत समुदाय व्यक्ती म्हणून मानधनावर काम करणाऱ्या तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्विकारणारी महिला लोकसेवक रेणुका रणवीर आत्राम (वय ३०) यांना लाचलु
लाच स्विकारणारी महिला लोकसेवक अटक


पालघर, 12 ऑगस्ट (हिं.स.)।महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमेद अभियान योजनेत समुदाय व्यक्ती म्हणून मानधनावर काम करणाऱ्या तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्विकारणारी महिला लोकसेवक रेणुका रणवीर आत्राम (वय ३०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर युनिटने रंगेहात पकडले.

तक्रारदार यांना वाडा येथील उमेद कार्यालयातून १९,८०० रुपयांचा मानधन चेक मिळाल्यानंतर, संबंधित महिला लोकसेवक यांनी मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. सोमवारी (दि. ११ ऑगस्ट) कायदेशीर पडताळणीत आरोपींनी लाच मागणी करून ती स्वीकारल्याचे निष्पन्न झाले.यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्रचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे व संजय गोवीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे, पोलीस निरीक्षक राकेश डांगे, हवालदार विलास भोये, योगेश धारणे, नवनाथ भगत, प्रकाश दळवी, पोलीस अंमलदार गीता कहार, आकाश लोहारे आणि जितेंद्र गवळे यांनी सापळा रचून ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande