रायगड, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। रायगड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून मुलींवर तसेच महिलांवर अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहेत. गेल्या अठरा महिन्यात जवळपास ३९० च्या आसपास अल्पवयीन मुलीं तसेच महिलांवर अत्याचार घडल्याचा घटना घडत असतानाच रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात एका पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर 15 वर्षीय मुलांने अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे.
याबाबत रायगड जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात गेले काही दिवस महिलांवरील अत्याचार अल्पवयीन मुलामुलींवर अत्याचार अशा प्रकारच्या घटना समोर येत असताना रायगड जिल्ह्यातही अशीच एक मोठी घटना समोर आली आहे.15 वर्षीय अल्पवयीन मुलाने 5 वर्षीय मुलीस एका झुडूपात ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणाची गंभीर दखल रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग अथवा मुलींवर अतिप्रसंग या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Sandesh Jaywant Salunke