
मुंबई, 12 ऑगस्ट (हिं.स.) आगामी १४ ऑगस्ट रोजी वॉर २ हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा असून, या सिनेमातील हृतिक आणि ज्युनिएर एनटीआर प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. यादरम्यान, सोशल मीडियावर ज्युनिअर एनटीआरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.यामध्ये सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये ज्युनिअर एनटीआर स्टेजवर बोलत असताना अचानक एका चाहत्यावर तो भडकल्याचं दिसत आहे.
वॉर २ च्या सिनेमाच्या प्रेमोशनल इव्हेंन्टमध्ये अभिनेता ज्युनिअर एनटीआर सहभागी झाला होता. यावेळी या इव्हेंन्टला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी झाली होती. प्रेक्षकांमध्ये केवळ त्याच्याच नावाचा जयघोष केला जात असल्याचं दिसत आहे. चाहते जोरजोरात ओरडत होते. तेवढ्यात एनटीआराने माईकवरून शांत राहण्याचं सगळ्यांना अवाहन केलं. मात्र, आवाज काही केल्या कमी होत नव्हता अखेर एनटीआरचा पारा चढला आणि त्याने एका चाहत्याला या कारणामुळे चांगलचं फैलावर घेतलं.'भाई, मी निघून जाऊ का? मी तुम्हाला काय म्हटलं? जेव्हा मी बोलतो तेव्हा शांतता राखा. मला माईक ठेवून स्टेज सोडून जायला एक सेकंदही लागणार नाही. मी बोलू? शांत बसा. असं एनटीआर म्हणाला. त्याच्या स्टेटमेंटमुळे चाहत्यांची अळी मिळी गूप चिळी झाली.वॉर २ हा हृतिक आणि ज्युनिअर एनटीआरचा बहुचर्चित सिनेमा स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अयान मुखर्जी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा यश राज फिल्म च्या स्पाय युनिव्हर्स मधील एक महत्त्वाचा सिनेमा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode