रायगड किल्ल्यावर अदिती तटकरे यांच्याकडून ध्वजारोहण; भरत गोगावले नाराज
Aditi Tatkare hoists flag at Raigad Fort; Bharat Gogavale upset
रायगड किल्ल्यावर अदिती तटकरे यांच्याकडून ध्वजारोहण; भरत गोगावले नाराज


रायगड किल्ल्यावर अदिती तटकरे यांच्याकडून ध्वजारोहण; भरत गोगावले नाराज


रयगड, 12 ऑगस्ट (हिं.स.)। आगास्वमी तंत्र्यदिनाच्या निमित्ताने ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर ध्वजारोहणाचा मान राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना देण्यात आला आहे. यामुळे रायगडचे माजी पालकमंत्री आणि शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार भरत शेठ गोगावले यांच्यात असलेली नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.

राज्य सरकारने जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार, रायगड जिल्ह्यातील ध्वजारोहणाचा कार्यक्रम किल्ले रायगडवर होणार असून, त्याचे अध्यक्षस्थान अदिती तटकरे यांना देण्यात आले आहे. परंतु हा निर्णय शिवसेना (शिंदे गट) आणि विशेषतः भरत गोगावले यांना अप्रिय वाटला आहे.

गोगावले यांनी याआधी अनेकदा रायगड जिल्ह्याच्या विकासात आपले योगदान असल्याचा उल्लेख करून, पालकमंत्रीपद आपल्याला मिळायला हवे होते, अशी मागणी केली होती. मात्र अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद दिल्यानंतर गोगावले आणि त्यांच्या समर्थकांत नाराजीचा सूर कायम आहे.

महाराष्ट्र दिनी (१ मे २०२५) रायगड किल्ल्यावर गोगावले यांनी स्वतंत्ररित्या झेंडावंदन केल्याने, त्या वेळीही हे राजकीय टकराव चव्हाट्यावर आला होता. आता स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातही त्यांना डावलल्याने, ते अधिकच असंतुष्ट असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गोगावले समर्थकांची प्रतिक्रिया

गोगावले यांच्या समर्थकांनी हा निर्णय अन्यायकारक आणि शिंदे गटाचा अपमान असल्याचे सांगत, कार्यक्रमात सहभागी न होण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर वेगळे झेंडावंदन सोहळे घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे

राजकीय विश्लेषकांच्या मते, रायगडसारख्या ऐतिहासिक स्थळांवरील कार्यक्रम हे केवळ सांस्कृतिक नव्हे, तर सत्तेच्या प्रतीकात्मक लढाईचे केंद्र ठरू लागले आहेत. यामुळे महायुती सरकारमध्ये अंतर्गत मतभेद अधिक तीव्र होण्याची चिन्हं आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sandesh Jaywant Salunke


 rajesh pande