छत्रपती संभाजीनगर, 29 ऑगस्ट (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातील विविध मंडळांची भारतीय जनता पार्टी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून आज नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
कुलस्वामिनी मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात गारखेडा, सिडको, कैलास नगर–राजाबाजार मंडळांची कार्यकारिणी घोषित झाली.
यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री.अतुल सावे, खासदार डॉ.भागवत कराड, आमदार श्री.संजय केनेकर,शहर जिल्हाध्यक्ष श्री.किशोर शितोळे, श्री.शिरीष बोराळकर, श्री.अनिल मकरिये, श्री.प्रमोद राठोड, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis