गर्भाशय कॅन्सरमुक्तीच्या लसीकरणामध्ये इनरव्हील क्लबचा पुढाकार लौकिकिस्पद : मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर, 29 ऑगस्ट (हिं.स.)। कोल्हापूर शहरात गर्भाशयाच्या कॅन्सर मुक्तीसाठी लसीकरण मोहीम राबविण्यामध्ये इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरचा मोठा पुढाकार आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. उषाराजे हायस्कूलमध्ये आयोजित एच. पी
कॅन्सरमुक्ती लसीकरण शिबिराला उपस्थित  वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, इनरव्हील क्लबचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थिनी


कोल्हापूर, 29 ऑगस्ट (हिं.स.)।

कोल्हापूर शहरात गर्भाशयाच्या कॅन्सर मुक्तीसाठी लसीकरण मोहीम राबविण्यामध्ये इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरचा मोठा पुढाकार आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

उषाराजे हायस्कूलमध्ये आयोजित एच. पी. व्ही. लसीकरण शिबिराला विद्यार्थिनींचा मोठा प्रतिसाद मिळाला. नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशन व इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर यांच्यावतीने उषाराजे हायस्कूलच्या विद्यार्थिनींना लसीकरण करण्यात आले

मंत्री मुश्रीफ म्हणाले, मी आयुष्यात अनेक महिला मंडळे बघितली. परंतु; इनरव्हील क्लबच्या माध्यमातून सुरू असलेले काम कौतुकास्पद आहे. मुली आणि तरुणींच्या कॅन्सर मुक्त जगण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीतून हाती घेतलेल्या कार्याला मी अंतकरणापासून सलाम करतो. अशी हृदयासक्त महिला मंडळी पुढे आल्यास राज्यच काय संपूर्ण देश सुद्धा कॅन्सर मुक्त लसीकरण होईल

मंत्री मुश्रीफ म्हणाले, कॅन्सर हा असा रोग आहे की, तो कधीच बरा होत नाही. त्याची लक्षणे दिसताच तात्काळ उपचार जर झाले तर त्याला प्रतिबंध आणि नियंत्रित करता येतो. भारतात दर आठ मिनिटाला एक महिला गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे मृत्यूमुखी पडते, ही फार दुर्दैवी बाब आहे. हे दुष्टचक्र रोखण्यासाठी एचपीव्ही ही लस निर्माण झाली. या लसीकरणामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होत नाही, हे आता जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनातून सिद्ध झाले. जिल्ह्यात नऊ ते २६ वर्षे वयोगटातील मुली आणि अविवाहित तरुणींची संख्या साडेतीन लाखाहून अधिक आहे. या सर्वांना पालकांच्या संमतीने मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, आता मुलं जास्तीत- जास्त वेळ मोबाईल घेऊनच बसलेली असतात. पालकांचे पण ती ऐकत नाहीत. या सगळ्याचा परिणाम डोळ्यांवर होतो. म्हणूनच पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी अभियान सुरू आहे. तसेच; गरजूंना मोफत चष्मे वाटपही केले जाणार आहे. ही मोहीमही वर्षभरात पूर्ण काम केली जाणार आहे.

यावेळी बिद्री कारखान्याचे संचालक भूषणदादा पाटील, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, डाॅ. शिशिर मिरगुंडे, डाॅ. गिरीश कांबळे इनरव्हिलच्या पास्ट प्रेसिडेंट हेमा भोसले, बिना मोहिते, डॉ. मनिषा चव्हाण, शर्मिष्ठा चौगुले, उत्कर्षा पाटील, उषाराजे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. चौधरी यांच्यासह इनरव्हिल क्लब ऑफ कोल्हापूर सर्व टीम व डॉक्टर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande