अकोला : पुरातून टँकर नेण्याचा प्रयत्न अंगलट, चालक सुखरूप बचावला
अकोला, 29 ऑगस्ट (हिं.स.) : एका टँकर चालकाला पुराच्या पाण्यात टँकर टाकण्याचं धाडस चांगलाच महागात पडलं असतं. सुदैवानं टँकर चालकासह दोघेजण सुखरूप आहेत. काही युवकांनी दोरीच्या साहाय्याने दोघांचा जीव वाचविला आहे. मात्र टँकरचं मोठं नुकसान झालं आहे. याचा व्
अकोला : पुरातून टँकर नेण्याचा प्रयत्न अंगलट, चालक सुखरूप बचावला


अकोला, 29 ऑगस्ट (हिं.स.) : एका टँकर चालकाला पुराच्या पाण्यात टँकर टाकण्याचं धाडस चांगलाच महागात पडलं असतं. सुदैवानं टँकर चालकासह दोघेजण सुखरूप आहेत. काही युवकांनी दोरीच्या साहाय्याने दोघांचा जीव वाचविला आहे. मात्र टँकरचं मोठं नुकसान झालं आहे. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अकोला - गायगाव रस्त्यावरील भौरद गावाजवळील पुलावर आज मोठा अपघात घडला. पुलावरील पाण्यातून मार्ग काढत असताना एक टँकर नियंत्रण सुटल्याने पलटला. या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. टँकरमध्ये असलेले चालकासह दोघे जण सुखरूप असल्याची माहिती आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. चालकाचा अतिउत्साहीपणा जीवघेणा ठरत होता. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अतिउत्साहीपणा अपघाताला कारणीभूत ठरल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.या अपघातामुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande