अकोट 84 खेडी पाणीपुरवठा योजनेचा आढावा
अकोला, 12 ऑगस्ट (हिं.स.)। सध्या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे ग्रामीण भागामध्ये पाणीपुरवठा सुरळीत करा व या भागात येणाऱ्या अडचणी व शासनाच्या केंद्र सरकारचा स्वच्छ पाणी घरापर्यंत पोहोचवण्याच्या कार्यक्रमाला गती द्या तसेच ग्रामीण भागामध्ये य
P


अकोला, 12 ऑगस्ट (हिं.स.)। सध्या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे ग्रामीण भागामध्ये पाणीपुरवठा सुरळीत करा व या भागात येणाऱ्या अडचणी व शासनाच्या केंद्र सरकारचा स्वच्छ पाणी घरापर्यंत पोहोचवण्याच्या कार्यक्रमाला गती द्या तसेच ग्रामीण भागामध्ये येणाऱ्या अडचणी ग्रामपंचायत च्या तक्रारी या संदर्भात अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या सोबत बैठक घेऊ आणि एक विषयाचे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथील ऑफिसमध्ये ग्रामीण भागातील पाण्यात पुरवठा विषयावर अधिकार्यांची बैठक घेऊन अनेक विषयांवरचर्चा करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्या याकरिता निर्देश दिले सोबत अंबादासजी उमाळे विनोद मंगळे मंगेश घुले विवेक भरणे व अधिकारी उपस्थित होते. यावेळी संतोष गव्हाणकर अधीक्षक अभियंता मजिप्रा मंडळ, अकोला, निलेश राठोड कार्यकारी अभियंता मजीब्रा विभाग अकोला , मिलिंद जाधव कार्यकारी अभियंता (प्रभारी), जिल्हा परिषद अकोला , श्री चौधरी उपअभियंता मजिप्रा अकोला/श्रीमती उमाळे उपअभियंता जिल्हा परिषद अकोला/निखिल राऊत उपकार्यकारी अभियंता मजिप्रा अकोला/दीपक मेहरे शाखा अभियंता/श्री नवले शाखा अभियंता जि प अकोला/श्री शेगोकार शाखा अभियंता जि प अकोला/श्री अंबादास सस्ते कंत्राटदार मजिप्रा अकोला/प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.विषय :खांबोरा व ६०गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ता. जि. अकोला व अकोट 84 खेडी प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजना ता. अकोट व तेल्हारा जि. अकोला याबाबत आढावा या बैठकीत घेण्यात आला तसेच ग्रामीण भागात येणाऱ्या अडचणी यावर चर्चा उपाय योजना यावर चर्चा होऊन तोडगा व निर्णय घेऊन कार्य करण्याची निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande