छ. संभाजीनगर - खाटू श्याम बाबा भक्तिमय भजन संध्या कार्यक्रम संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 31 ऑगस्ट (हिं.स.)। विजयपथ प्रतिष्ठान संचालित हरसिद्धी गणेश मंडळ तसेच युगंधर महोत्सव २०२५ अंतर्गत आयोजित खाटू श्याम बाबा भक्तिमय भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री . संजय
हरसिद्धी गणेश मंडळ


छत्रपती संभाजीनगर, 31 ऑगस्ट (हिं.स.)।

विजयपथ प्रतिष्ठान संचालित हरसिद्धी गणेश मंडळ तसेच युगंधर महोत्सव २०२५ अंतर्गत आयोजित खाटू श्याम बाबा भक्तिमय भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री . संजय शिरसाठ यांनी आरतीचे यजमान म्हणून उपस्थित होते.

श्यामबाबांच्या दरबारात रंगलेल्या भक्तिरसाने ओथंबलेल्या भजनांच्या सुरांनी वातावरण भक्तिमय झाले. पालकमंत्री उपस्थितीने संपूर्ण सभामंडपात श्रद्धा, आनंद आणि भक्तीचे अवर्णनीय वातावरण अनुभवायला मिळाले.

प्रत्येक भक्ताच्या अंत:करणात श्यामबाबांच्या चरणी भक्तीभाव दाटून आला आणि या अद्वितीय उपस्थित राहिलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान झळकत होते.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande