लातूर, 31 ऑगस्ट (हिं.स.)।जिल्ह्यासह निलंगा मतदारसंघामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील पांढरवाडी येथे भाजपचे निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी शासकीय आढावा बैठक घेतली. प्रशासनासह सर्व प्रमुख अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून भागातील सद्यस्थितीचा आढावा व उपाययोजनांची माहिती घेतली.
परिसरात अनेक ठिकाणी पाणी गेल्यामुळे नागरिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. तसेच पशुधनांच्या हानी त्यांच्यावर फार मोठे दु:ख कोसळले आहे. त्यामुळे सध्या शासन व प्रशासन यांचाच त्यांना आधार असून सर्वांनी नागरिकांना धीर द्यावा. तसेच पंचनाम्यांची कारवाई अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना सर्वांना दिली.
याचबरोबर पावसाचा जोर सध्या कमी झाला असला तरी देखील पाण्याचे प्रमाण मात्र वाढते उतरते आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना करून बचाव पथकांनी तयारीत राहावे, असे निर्देशही दिले.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis