नांदेड, 31 ऑगस्ट (हिं.स.)।
धर्माबाद तालुक्यात गोदाकाठच्या आजूबाजूच्या भागांत पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे अनेक गावांत पाणी शिरल्यामुळे एनडीआरएफ टीम बचावासाठी आली होती. गावकऱ्यांनी यासाठी त्यांची व्यवस्था केली.
एनडीआरएफ टीमसाठी रात्री मुक्काम व जेवणाची व्यवस्था धर्माबाद येथील सुप्रसिध्द दानशुर व्यापारी सुबोध काकाणी ह्यांनी केली .
गेल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यात पावसामुळे प्रेझेंट मोठे नुकसान झाले धर्माबाद तालुक्यातील नदी नाली ओढे वाहू लागले अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतजमीनचे देखील नुकसान झाले पशुहानी देखील मोठ्या प्रमाणात झाली
नदी नाले यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ ची टीम सज्ज ठेवण्यात आली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis