अकोला, 12 ऑगस्ट (हिं.स.)।स्थानिक विकास निधी अंतर्गत सामाजपयोगी धर्म आणि संस्कृती लोक देवत तसेच जनतेला उपयोगी पडणाऱ्या कामांना प्राधान्य देऊन ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुतीकरण करण्यासाठी सभागृह त्यामुळे छोटे मोठे कार्यक्रम गावातून कमी वेळेत कमी खर्चामध्ये बचत होऊ शकते आणि धार्मिक कार्यक्रम सोबत वेगवेगळे कार्यक्रम करण्यासाठी सोपीनाथ महाराज संस्थान सातत्याने जनतेच्या पाठीशी उभी असल्यामुळे या भागामध्ये मोठ्या यात्रेसाठी सुविधा मिळवून देण्यासाठी आपण सभागृहनिर्मिती करण्याचा निर्णय प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
घुसर येथील सोपिनाथ महाराज संस्थानच्या विकास निधितून नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहाचे लोकार्पण पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते.
सर्व सुविधायुक्त सभागृह श्री सोपिनाथ महाराज चरणी या प्रसंगी अर्पण केले. पंचकोशीमध्ये महत्त्वाचं सोपीनाथ महाराज संस्थान च्या कार्यक्रमाला उपयोगी पडेल असा सभागृह निर्माण केला आहे तसेच वेगवेगळे कार्यक्रम या भागामध्ये होऊन ग्रामीण संस्कृती जतन काम होत असल्याचे आमदार सावरकर यांनी सांगितले.
यावेळेस प्रवीण पाटील हगवणे, अनिलभाऊ गावंडे,अंबादासजी उमाळे,राजेशजी बेले,देवेंद्रजी देवर, बाबूलाल कांगटे,भरत काळमेघ,महेंद्र काळे,अविनाश पागृत,दादारावजी कांगटे, भालचंद पागृत, गुणवंत वाकोडे,चंदू खडसे,सुभाष रायबोले,श्रीकृष्ण बेहरे, जगदीश पागृत,प्रदीप पागृत,सचिन पागृत,सचिन बेहेरे,कुश माहोरे,अंकुश कांगटे,लव भटकर,निखिल काळमेघ, शरद कराळे,श्रीकृष्ण झटाले,वैभव तराळे,किशोर रामागरे,राजेश घावट, राजेश कांगटे,तेजराव काटे, दामोदर पागृत,सुभाष टिकार,नंदलाल डहाके, प्रथमेश म्हातुरकर, सुभाष घावट गुरुजी, लक्ष्मण बेहरे,सुनील पागृत उपस्थीत होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे